प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील 20 आठवडय़ांपेक्षा अधिकची गर्भधारणा असलेल्या गतिमंद तरुणीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. जबरदस्तीच्या शरीसंबंधातून गर्भधारणा झालेल्या या तरुणीच्या नातेवाईकांनी यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होत़ी या तरुणीची मानसिक व शारीरिक परिस्थिती लक्षात घेवून उच्च न्यायालयाने तिचा गर्भपाताचा अर्ज मंजूर केला आहे.
पीडित तरुणी रत्नागिरी जिह्यातील एका गावातील रहिवासी आह़े ही तरूणी गतिमंद असल्याने तिच्या असहाय्यतेचा फायदा उठवून तिच्याशी तिच्या ओळखीच्या तरूणाकडून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे समोर आले होत़े ही घटना मे 2020 मध्ये उघडकीस आली होत़ी दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने या तरूणीची वेळेत सोनोग्राफी करणे शक्य झाले नव्हते. तिच्या शरीरात बदल जाणवू लागल्याने तिला डॉक्टरकडे नेण्यात आल़े यावेळी ती 20 आठवडय़ांपेक्षा अधिकची गर्भवती असल्याचे समोर आल़े
दरम्यान पीडित मुलीच्या असहाय्यतेचा फायदा उठवून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबध ठेवल्याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल़ी तसेच पीडित तरूणी गतिमंद व अविवाहित असल्याने ती जन्माला येणाऱया मुलाचा सांभाळ करण्यास सक्षम नाह़ी या कारणास्तव पीडितेच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयाकडे तिचा गर्भपात करण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी अर्ज दाखल केला होत़ा गर्भपात कायद्यानुसार 20 आठवडय़ापेक्षा अधिकची गर्भधारणा असल्यास त्यासाठी न्यायालयाची परवानगी अत्यावश्यक आह़े या प्रकरणी न्यायालयाने मुलीची मानसिक व शारीरिक परिस्थिती लक्षात घेता तिला गर्भपात करण्यास परवानगी दिल़ी त्याही पुढे जात उच्च न्यायालयाने रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाला या गर्भपातादरम्यान तरूणीच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत