वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट
डब्ल्यूटीए टूरवरील जर्मनीतील स्टुटगार्ट येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीने एकेरीचे उपांत्य फेरी गाठताना प्लिसकोव्हाचा पराभव केला.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बार्टीने प्लिसकोव्हावर 2-6, 6-1, 7-5 अशी मात करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. बार्टीने शनिवारी या विजयाबरोबरच आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. झेकच्या प्लिसकोव्हाने 2018 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.