प्रथमच आशियामध्ये होणार आयोजन
वृत्तसंस्था/ ज्युरिख-सिंगापूर
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्लूइएफकडून जगभरातील राजकिय आणि व्यवसायांचे नेतृत्व करणाऱयांसोबतच्या वार्षिक बैठकीचे आयोजन यावेळी आशियातील सिंगापूर येथे करण्यात आल्याची माहिती आहे. आता याचे आयोजन सिंगापूर येथे पुढील वर्षी होईल.
पुढील वर्षी हे नियोजन मात्र स्विर्त्झलँडच्या झुरिच येथे होणार नसून ते सिंगापुरात होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.कोविड-19 च्या संकटामुळे अनेक समस्यांना टक्कर देत फोरमची वार्षिक बैठक होण्याचे संकेत आहेत. यामध्ये सुरक्षेचा मुद्दा विचारात घेत 1971 पासून प्रत्येक वर्षातील जानेवारीत डब्लूइएफची आयोजित होणारी बैठक दुसऱया वेळीही पुन्हा एकदा स्विर्त्झलँडमध्ये होणार नाही आहे. ती स्विर्त्झलँडबाहेर होत असून यावेळी ही बैठक प्रथमच आशियात होणार असल्याची माहिती आहे.
सदर बैठकीसंदर्भातील काही प्रमाणात माहिती सादर करण्यात आली असून यामध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची विशेष वार्षिक बैठक 2021 सिंगापूर येथे 13 ते 16 मेपर्यंत होण्याचे संकेत आहेत. 2022 मधील बैठक पुन्हा स्विर्त्झलँडच्या दावोस येथे होणार असल्याचे माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.