शंभरहून अधिक देशांमध्ये होणार उपकरणांची निर्यात: चेन्नईत निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देऊ पाहणाऱया 5 जी सेवेबाबत भारतीयांची उत्सुकता वाढलेली आहे. याला अनुषंगून नोकीया कंपनीने 5 जी उपकरणांच्या निर्मितीला सुरूवात केली आहे. उपकरणांची 100 हून अधिक देशांना निर्यातही केली जाणार असल्याचे समजते. यासाठी नोकियाचे सध्याचे अधिकार हे फिनलँडची कंपनी एचएमडी ग्लोबल यांच्याकडे असल्याची माहिती आहे.
5जी सेवेसाठी आवश्यक असणाऱया यंत्रणेसाठी लागणारी उपकरणे नोकीया आपल्या चेन्नईतील कारखान्यात निर्मिती करते आहे. 2018 नंतर कंपनीकडे 600 कोटींची गुंतवणूक झाली आहे. दूरसंचार संपर्क उपकरणांची निर्मिती गेल्या काही वर्षापासून कंपनी करते आहे. सदरच्या उपकरणांची निर्यात बाहेरच्या देशांना केली जाणार आहे. 5 जी सेवेसाठी पुढच्या टप्प्यात असणाऱया विकसित देशांना सदरची उपकरणे निर्यात करण्याची तयारी चालली आहे. मेक इन इंडियाच्या मोहिमेत नोकीयाच्या चेन्नईतील कारखान्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक स्तरावर भारतात उत्पादनाला वाव मिळण्यासाठी सरकार मेक इन इंडियात सहभागी होण्याचे आवाहन करते आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नोकीया सध्या 5 जीसाठी लागणारी एममिमोआधारीत उपकरणे तयार करते आहे. उत्तम वेगवान क्षमता असलेले तंत्रज्ञान या उपकरणांमध्ये असेल. भारतासह इतर देशांमध्ये तंत्रज्ञानानेयुक्त उपकरणे वापरता येणार आहेत.