ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 3 लाख 99 हजार 81 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 67 हजार 857 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 56 हजार 199 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 85.30 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 3 हजार 349 रुग्णांपैकी 2 लाख 63 हजार 652 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 32 हजार 734 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 963 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.91 टक्के आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 958 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 87, सातारा जिल्हयामध्ये 557,सोलापूर जिल्हयामध्ये 495, सांगली जिल्हयामध्ये 529 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 290 अशा रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 86 हजार 138 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 67 हजार 857 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.