ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 हजार 932 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 6 हजार 835 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 466 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.54 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.16 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 15 हजार 942 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 9 हजार 446 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 852 आहे. कोरोनाबाधित एकूण 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 350 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.57 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 37 हजार 946 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 36 हजार 754 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 192 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 16 हजार 497 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 19 हजार 932 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.