ऑनलाईन टीम / पुणे :
माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश असेल.
11 आणि 12 जानेवारी रोजी पुण्यातील स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागजवळ पुणे येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनंत घरत म्हणाले की, हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील जास्तीत जास्त युवकांनी या लघुपट महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन अनंत घरत यांनी केले आहे.
राज्यस्तरीय पुणे पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी 5 जानेवारीपर्यंत myearththree@gmail.com यावर मेल करावा, असे आवाहन सोमनाथ पाटील यांनी केले.