ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड-19 ची टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन, असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पुणे विभागात आतापर्यंत 19 हजार 652 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 32 हजार 886 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 12 हजार 45 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 617 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.