ऑनलाईन टीम / सातारा :
रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ लसीचे उत्पादन आता पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया करणार आहे. सप्टेंबर महिन्यात या लसीची पहिली खेप भारतात तयार होणार आहे. स्पुतनिकडून यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.
स्पुतनिक लसीच्या उत्पादनासाठी आज रशियन संचालक इन्वेस्टमेंट फंड आणि सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये करार झाला. दोन्ही कंपन्यांमध्ये दरवर्षी 300 मिलियन (30 कोटी) लसीचे डोस बनवण्यासाठी करार झाला आहे. त्यामुळे भारतात ‘कोवॅक्सिन’ आणि ‘कोविशिल्ड’नंतर आता तिसऱ्या लसीचेही उत्पादन होणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात सीरम ‘स्पुतनिक-व्ही’ची पहिली खेप तयार करणार आहे.