श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमधील पूँछ येथे घुसखोरी करणाऱया दोन दहशतवाद्यांना सोमवारी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी यमसदनी पाठविले. पूँछ येथे ‘एलओसी’वरून घुसखोरी होत असल्याची माहिती मिळताच लष्करी जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. यावेळी झालेल्या संघर्षात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले. मृत दहशतवाद्यांकडे मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा सापडला असून त्यात एके-47 रायफल्सचा समावेश असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. या चकमकीत लष्कराची कोणतीही हानी झालेली नाही.