नवी दिल्ली
टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये कार्यरत असणाऱया पॅनासोनिक इंडियाच्या नव्या चेअरमनपदी नुकतीच मनीष शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जपानमधील बहुराष्ट्रीय कंपनी पॅनासोनिक कॉर्पोरेशनने मनीष यांना बढती दिली आहे. याखेरीज ते पॅनासोनिक ऑपरेशनल एक्सलन्स इंडिया आणि पॅनासोनिक इंडिया अप्लायन्सेस कंपनी, लाइफस्टाइल अपडेटस् बिझनेस विभागाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहेत. याआधी ते कंपनीत दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष व सीईओ म्हणून कार्य करत होते.