वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
अमेरिकेच्या व्हीनस व सेरेना विल्यम्स भगिनी तसेच त्यांचीच देशवासी सोफिया केनिन यांनी सिनसिनॅटी येथे होणाऱया वेस्टर्न अँड सदर्न ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. अमेरिकन स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी ही स्पर्धा आहे.
‘पुढील आठवडय़ात होणाऱया या स्पर्धेत मी खेळू शकणार नाही. विम्बल्डनमध्ये झालेल्या दुखापतीतून मी अद्याप सावरलेली नाही, त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला,’ असे ही स्पर्धा दोनदा जिंकणाऱया सेरेनाने सांगितले. गेल्या जूनमध्ये झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत सेरेनाला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतूनच माघार घ्यावी लागली होती. सिनसिनॅटीतील स्पर्धेत खेळण्याऐवजी तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यावर तिचा भर आहे. याच महिन्यात अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा होत असून बऱयाच काळापासून तिला हुलकावणी देत असलेले 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे तिचे ध्येय आहे. तिची बहीण व्हीनस व तिची देशवासी केनिन यांच्या माघारीचे कारण मात्र आयोजकांनी दिलेले नाही. केनिनने मात्र या स्पर्धेत न खेळण्याचा कठीण निर्णय घेतल्याचे सांगितले. तिलाही दुखापत झाली असून यूएस ओपनआधी पूर्ण तंदुरुस्त होण्यावर तिनेही लक्ष केंद्रित केले आहे. मागील वर्षी तिने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.