ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
इस्त्रायल पेगॅसस स्पायवेअरचा गैरवापर करत वरिष्ट पत्रकार, न्यायाधीस, राजकीय नेते यांची माहिती चोरत त्यांच्यावर सरकारने पाळत ठेवल्याच्या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर सुनावणी सूरु आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी १७ ऑगस्ट रोजी केंद्राला पेगॅसस प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकांना उत्तर देण्याबाबत एक नोटीस जारी केली होती. यावर सोमवार दि. 13 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली.
न्यायालयात या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रमण यांनी सरकारला या प्रकरणावरुन फटकारले आहे. सरकार या प्रकरणावर काय करत आहे. हे न्यायालयाला जाणून घ्यायचे आहे, सरन्यायाधीश रमण यांनी म्हणाले की. आधीच्या सुनावणीत केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोनदा वेळ घेतला होता. पण आता त्यांनी सरळ नकार दिल्याने सरन्यायाधीश रमण यांनी सरकारला धारेवर धरले. या सुनावणीत सरकारची बाजु मांडत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकार या प्रकरणाच्या तपासासाठी एक पॅनल तयार करण्यास तयार आहे असे सांगितले आहे. .