मुंबई
सर्वात मोठा पेटीएम या आयपीओला ग्राहकांचा तिसऱया दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. 9.13 कोटी इक्विटी समभागांकरीता बोली लावली गेली. कंपनीचा आयपीओ तिसऱया आणि शेवटच्या दिवशी 1.66 पट सबस्क्राइब झाला आहे. आयपीओअंतर्गत 18 हजार 300 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. बाजारात कंपनी 18 नोव्हेंबरला उतरणार असल्याचे समजते. कोल इंडिया (15 हजार 475 कोटी), रिलायन्स पॉवर (11 हजार 700 कोटी) यांच्या तुलनेत पेटीएमचा आयपीओ सर्वात मोठा असणार आहे.