पेट्रोलपंपचालकाचा संशयित आरजी सदस्य असल्याचा दावा : रिव्हॉल्युशनरी संघटनेचे स्पष्टीकरण : आम्ही अहिंसावादी, युवकाला ‘झिरो’ पडला महागात
प्रतिनिधी / फोंडा
फेंडा बसस्थानकाजवळील कवळेकर पेट्रोलपंपवर दारूच्या नशेत धांगडधिंगा घालून येथे पेट्रोल भरणाऱया कामगाराला मारहाणप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका कारचालकांला अटक केली आहे. रूपेश किशोर नाईक (29, खडपाबांध-फोंडा) असे त्याचे नाव आहे. सदर घटना मंगळवार 1 जून रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास घडली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपेश हा मद्यधुंद अवस्थेत कारगाडीसह पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्यासाठी आला होता. पंपवरील कामगाराने पेट्रोल भरताना ‘झिरो’ पाहा असे संबोधित करत मिटरकडे हातवारे केले. एकमेव शुल्लक कारणावरून झालेला वाद शिवीगाळीनंतर हातघाईवर पोचला. कारचालकाने वाहनातून बाहेर येत त्याला मारहाण केली. बचावासाठी कामगाराने स्वच्छतागृहात धाव घेतली असता तिथेही दरवाजा तोडून संशयिताने माराहण केली. या लटाफटीत कामगाराने परिधाक केलेला शर्टही पुर्णपणे फाडला गेला. पेट्रोलपंप चालक तथा तक्रारदार कौस्तुभ कवळेकर यांनी संशयित हा एका ‘आरजी’ संघटनेचा सदस्य असल्याचा दावा करीत असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र याप्रकरणी पुष्टी अजून झालेली नसून फोंडा पोलिसांनी पंपवरील सीसीटीव्ही फुटेज मागविली आहे. त्यादिशेने तपास सुरू असल्याचे निरीक्षक मोहन गावडे यांनी माहिती दिली.
रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे स्पष्टीकरण, आम्ही अहिंसावादी
पेट्रोलपंपवरील धांगडधिंगाचा व्हीडीओ राज्यभर धुमाकुळ घालत असून रिव्हॉल्युशनरी गोवन्सला या वादात ओडले जात आहे. यामुळे अहिंसवादी असलेल्या आरजी संघटनेचे नाव बदनाम करण्याचा घाट काही विरोधकांनी केला असल्याचे आरजीचे संस्थापक सदस्य विश्वेश नाईक म्हटले आहे. सदर व्हीडीओची दखल घेत रेव्होल्युशनरी गोवन्स या संघटनेने फोंडा पोलिस स्थानकांशी संपर्क साधून संशयिताशी रेव्होल्युशनरी संघटनेचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आरजी संघटना ही अहिंसावादी असून कागदोपत्री व्यवहारावर विश्वास ठेवून काम करीत आहे. हिंसा करणाऱया युवकाने समज आरजी संबोधलल्यास त्याची सत्यता तपासून पाहावी. आरजीचे नाव बदनाम करण्याच्या हेतूने सदर प्रकार असल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विश्वेश नाईक यांनी दिली.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी कारवाई करताना संशयिताविरोधात भा.दं.सं. 448, 323, 504, 506(2) कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.