नवी दिल्ली : देशाची निर्यात सलग पाचक्या महिन्यात घसरणीत राहिली आहे. यासंदर्भात सरकारकडून आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोलियम, लेदर, जेम्स आणि ज्वेलरीचा व्यापार घटल्याने जुलै महिन्यात देशाची निर्यात जवळपास 10.21 टक्क्मयांनी घटून 23.65 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील एप्रिल, मे आणि जून या महिन्यातही निर्यात मोठय़ा प्रमाणात घसरली आहे. दुसऱया बाजूला देशाची आयातही 28.4 टक्क्मयांनी कमी होऊन 28.47 अब्ज डॉलरवर स्थिरावली आहे. मागील महिन्यात देशाचा व्यापार 4.83 अब्ज डॉलरने तोटय़ात राहिला आहे. एक वर्षाच्या अगोदर याच महिन्यात देशाचा व्यापार 13.43 अब्ज डॉलरने घटला होता. एप्रिल, मे आणि जून महिन्यांच्या तुलनेत जुलैमधील निर्यात काही प्रमाणात सावरल्याचे पहावयास मिळाले आहे. एप्रिलमधील निर्यात 60.28 टक्क्मयांनी तर मे मध्ये हा आकडा 36.47 टक्क्मयांवर आणि जूनमध्ये हा टक्का 12.41 वर राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. जुलैमध्ये तेल आयात 31.97 टक्क्मयांनी घटून 6.53 अब्ज डॉलरवर राहिली आहे. सोने आयात याच दरम्यान 4.17 टक्क्मयांनी वधारुन आणि 1.8 अब्ज डॉलरवर राहिलेली आहे.
Previous Articleहत्तीमुखी गणपती पूजन परंपरा
Next Article महाराष्ट्रात 14,492 नवे कोरोना रुग्ण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.