ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वच क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाहनचालकांचा खिशाला मात्र, कात्री लागणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात एका रुपयाची वाढ होणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केलं.
पवार म्हणाले, वाहन इंधनाच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. इंधनावर उपकर आकारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पुढील दोन वर्षांसाठी हा उपकर आकारला जाईल, असं ही ते यावेळी म्हणाले. तसेच ही रक्कम पर्यावरणीय समस्यांसाठी काम करणाऱया ग्रीन फंडाकडे पाठवली जाईल.