तं त्रज्ञानाचं जग मुलांसाठी बरंच आकर्षक पण वेड लावणारं असतं. त्यामुळे मुलांना मोबाइलचं फार आकर्षण वाटतं. कोवळय़ा वयात मुलांची ग्रहणक्षमता जास्त असते. त्यामुळे ते पालकांआधीच गॅजेटमधल्या अनेक गोष्टी शिकून घेतात. पालकांना त्याची कल्पना नसल्यास त्यांच्या नकळत मुलं या गॅजेटचा चुकीचा वापर करू शकतात. गॅजेटच्या सततच्या सवयीपुढे त्यांना पालकांचा सहवासही नको वाटतो.
आजची पिढी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करते. त्यातच आत्ताची लहान मुलं तर ‘लईच हुशार’ आहेत. अगदी बाळ असल्यापासूनच अनेकांसमोर मोबाइल होतात. त्यामुळे तो हाताळायच्या बाबतीतही ते आपल्या आईबाबांपेक्षा वरचढच आहेत. पण आपला मुलगा/मुलगी मोबाइलवेडी तर होत नाही ना? हे पाहणं, पालकांसाठी अत्यावश्यक आहे. अगदी पाळण्यात असल्यापासून मुलांच्या हातात एखाद्या खेळण्यासारखा मोबाइल दिला जातो आणि सुरुवातीला मोबाइलवरच्या गेम्सना टाळय़ा वाजवणारी ही लहानगी कधी मोबाइलवेडी होतात, हे कळतंच नाही. ना त्यांना ना पालकांना. सतत मोबाइलच्या वापराने केवळ डोळय़ांवर परिणाम होतो, असा अनेक पालकांचा गैरसमज असतो. पण डोळय़ांबरोबरच शरीराच्या इतर अवयवांवरही मोबाइलचा अती वापर वाईट परिणाम करत असतो. हे परिणाम शारिरीक तसंच मानसिकही असू शकतात.
- सतत मोबाइलवरच असणं
- मोबाईलवर असताना वेळेचं भान न रहाणं
- सतत मोबाईल चेक करत रहाणे
- अंथरुणातही मोबाईलवर गेम खेळणे
- अबोल होणे
- मोबाईल न दिल्यास प्रचंड राग आणि चिडचिड करणे
गॅजेट्सच्या अती वापरामुळे होणारे शारीरिक परिणाम
- दृष्टी कमी होणे, डोळे कोरडे पडणे, डोळे लाल होणे, डोकेदुखी, ताण येणे, मान दुखणे, अंगठय़ाचे हाड दुखणे, मणक्मयाचा त्रास होणे, झोपेशी संबंधीत आजार, झोप न येणे
- स्वभाव रागीट आणि हिंसक होणे
- मानसिक परिणाम
- एकटं वाटणे, संवादकौशल्य हरवणे, आत्मविश्वास गमावणे, मूडमध्ये सतत बदल होणे
काय काळजी घ्याल?
- मुलांचं वय पाहून त्यांना गॅजेट्स हाताळायला द्या.
- मुलांच्या आवडते असलेले विविध गेम्स त्यांच्यासाठी किती घातक आहेत, अथवा नाहीत हे ाsrं.दु या वेबसाइटवर तपासून पाहा.
- मुलांच्या गॅजेट वापरावर मर्यादा ठेवा.
- झोपण्याच्या एक तास आधी सर्व गॅजेट्स बंद करुन मुलांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधा.
- बारा वर्षाखालील मुलांच्या वापरावर नजर ठेवा. ते मोबाइलवर नेमकं काय करतात, हे तपासून पाहा.
- मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या. मुलांना फक्त टेक्नॉलॉजीची ओळख करून देऊ नका. तर ख??ऱयाखु?ऱया व्यक्तींनाही भेटवा.