ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलवर 2.5 तर डिझेलवर 4 रुपये कृषी अधिभार लावण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे 93 रुपयांवर गेलेले पेट्रोल शंभरीपार जाणार का, याची भीती सर्वसामान्यांना होती. मात्र, पेट्रोल-डिझेलवरील बेसिक एक्साईज आणि स्पेशल एक्साईज कमी करण्यात आल्यामुळे ग्राहकांना फारसा फरक पडणार नसल्याचे सीतारामन यांनी सांगितले.