ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशात जानेवारी महिन्यात नेहमीपेक्षा 58 टक्के पाऊस कमी झाला. 2021 वर्षाच्या पहिल्या महिन्यात राज्यात केवळ 37.6 मिमी पाऊस पडला. गेल्यावर्षी 47 टक्के इतका पाऊस पडला होता. शिमला आणि मनालीमध्ये जानेवारी महिन्यात बर्फवृष्टी झाली नाही. कल्पमध्ये 106 आणि केलांग मध्ये 62 सेंटिमीटर असे रेकॉर्ड आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात सर्व जिल्ह्यात नेहमी पेक्षा कमीच पाऊस पडला. पाऊस आणि बर्फवृष्टी 2 ते 7 जानेवारी आणि 24 जानेवारी याच कालावधीत झाली. यामध्ये बिलासपूर मध्ये 66 टक्के, चंबा 55, हरीमपुर 55, कांगडा 42, किन्नौर 51, कुल्लू 49, लाहौर – स्पिती 58, मंडी 73, शिमला 65, सिरमौर 39, सोलन 65 आणि ऊनामध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला.
दरम्यान, 2017 मध्ये 62, 2012 मध्ये 32 आणि 2008 मध्ये सात टक्के अधिक पाऊस पडला होता.