प्रतिनिधी / सोलापूर
केंद्र सरकारच्या जनताद्रोही निर्णयाविरोधात आज शनिवारी सोलापूर शिवसेनेतर्फे सायकल व बैलगाडी रॅली काढण्यात आली. मोदी सरकारच्या नोटबंदी जीएसटी व किसान विरोधी कायदा आज पर्यंत पेट्रोल दरवाढीच्या उच्चांक गाठण्यात आला व केंद्रीय मंत्री दानवे यांचे शेतकरी विरोधात विधानाच्या निषेधार्थ ही रॅली जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वात चार हुतात्मा चौक ते डफरीन चौक पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सायकलवर मोदी सरकारच्या निषेधाचे फलक लावण्यात आले होते. केंद्रीय मंत्री दानवे राजीनामा द्या, पेट्रोल भाववाढ रद्द करा अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. बैलगाडीवर दुचाकी वाहन लावून जनता देशी मोदी सरकारचा शेतकर्यांच्यावतीने निषेध करण्यात आला. या रॅलीत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे विरोधी पक्ष नेते महेश कोठे, नगरसेवक अमोल शिंदे, भारत बडूरवाले, विठ्ठल वानकर, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, भीमाशंकर म्हेत्रे, संतोष पाटील, रवी कोळेकर ,महेश धाराशिवकर, योगीराज पाटील, विष्णू कारमपुरी ,लहू गायकवाड, संताजी भोळे, बाळू गायकवाड ,चंद्रकांत मानवी ,सुरेश जगताप ,बालाजी चौगुले, संजय गवळी ,तुकाराम मस्के, बबलू चौगुले आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निषेध आंदोलन यशस्वी करण्यासाठी अकिल सय्यद, राज पांढरे , योगेश शिरसागर, सचिन सुरवसे, दत्ता खलाटे ,बाळू पवार ,गजरात पोद्दार ,रोहित सुरवसे , संदीप भोसले आदींनी परिश्रम घेतले.