सातारा / प्रतिनिधी :
पुणे येथील पेडल पुशर ग्रुप ‘पर्यावरण वाचवा सायकल चालवा’ असा संदेश देत आज पहाटे चार वाजता पुणे येथून गोव्याच्या दिशेने रवाना झाला. सकाळी बॉंम्बे रेस्टॉरंट चौकात त्यांचे सातारा सायकल ग्रुपचे तुषार भोईटे, दत्ता नवघणे, सचिन नवघणे, तेजस सागावकर यांनी सातारा पध्दतीने कंदी पेढे देऊन स्वागत केले. तसेच पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.