जिल्हा पेन्शनर संघटनेच्या बैठकीत निर्णय
महादेव पाटील, मधुकर पोवार यांचा सत्कार
प्रतिनिधी / कोल्हापूर
पेन्शन वाढीसह इतर सुविधांचा लाभ मिळण्यासाठी गेली दहा वर्ष सुरू असलेले आंदोलनाचा लढा पेन्शनरांना न्याय मिळेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार पेन्शनर संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी वारणा साखर कामगार संघ (इंटक) च्या कार्यकारणीवर बिनविरोध निवड झाले बद्दल महादेव पाटील, मधुकर पोवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
निवृत्त कर्मचारी ईपीएस ९५ राष्ट्रीय समन्वय समिती सलग्न कोल्हापूर जिल्हा पेन्शनर संघटनेची बैठक श्रमिकच्या संताराम पाटील सभागृहात बिद्री साखर कामगार सभेचे नेते आनंदराव आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कोरोना विषाणू संसर्गाच्या निमीत्ताने गेली आठ महिन्यानतर प्रथमच आयोजित बैठकीस सॅनीटायझर, मास्कचा वापर सुरक्षित अंतराचे नियम पाळत पेन्शनरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
पेन्शनर संघटनेचे सचिव ए. बी. पाटील यांनी स्वागत करून सुरू असलेल्या आंदोलनाचा अढावा घेतला. ईपीएस ९५ योजनेतील ६५ लाख पेन्शनरांना भगतसिंग खोशियारी समितीच्या शिफारसी प्रमाणे मासिक तीन हजार रूपये व त्यास महागाई भत्ता जोडून पेन्शन मिळाली पाहिजे सर्वोच्च न्यायालयातील पेन्शनवाढीचा निर्णय लवकर लागावा त्याची अमंलबजावणी केंद्र सरकारने त्वरीत करावी यासाठी सुरू असलेला लढा तीव्र करावा प्रत्येक खासदार यांना या कामी सहकार्य व्हावे यासाठी निवेदन देण्यात यावे. कोरोनाचे संकट अजून गेले नसल्याने लेखी पत्रव्यवहारावर व निवेदनावर हा लढा सुरू ठेवत असल्याचे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे, संघटक सुभाष गुरव, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शिवाजी देसावळे, शिवाजी सावंत यानी सांगितले.
पेन्शनवाढी संदर्भात सोशल मिडीयावर तसेच प्रसार माध्यमात खोट्या व चुकीच्या माहितीच्या अधारे येणारी माहिती दिशाभूल करणारी आहे पेन्शनवाढीसाठी प्रयत्न करतो असे कारण सांगून काही संखटनेचे कार्यकर्ते पैसा गोळा करीत आहेत अशा लुबाडणूक करणाऱ्या पासून सावध रहा तसेच पेन्शनवाढीचा निर्णय अंतिम टप्यावर आला आहे या संसदीय अधिवेशन काळात दिल्लीत आंदोलनास परवानगी मिळाली नाहीतर स्थानिक पातळीवर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय समन्वय समितीचे समन्वयक दिलीप पाटील यानी सांगितले.
वारणा कामगार संघटनेवर महादेव पाटील, मधुकर पोवार यांची निवड झालेबद्दल आनंदराव आबीटकर, शामराव मोरे, सुभाष गुरव, शिवाजी सावंत, ए.बी.पाटील, शिवाजी देसावळे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. बी. एस पाटील यांनी आभार मानले.