लिमाः
पेरु या देशातील पश्चिम भागाला शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात भुकंपाचे धक्के बसले असून यामध्ये अंदाजे 41 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येते. पेरुतील आरोग्य विभागाने यासंबंधातील माहिती दिली आहे. स्थानिक प्रमाण वेळेनुसार शुक्रवारी 12.10 मिनिटांनी पेरुतील पश्चिम भागांना भुकंपाचे धक्के बसले. सुल्ताना शहरापासून 36 किलोमीटर अंतरावर भुकंपाचा केंद्रबिंदू होता, अशीही माहिती समोर आली आहे. सुल्तानामध्ये भुकंपाच्या धक्क्याने कमीत कमी 35 जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आरपीपी रेडियोने दिलेल्या माहितीनुसार पिऊरा भागात 6 जण जखमी झाले आहेत. एकंदर जखमींपैकी 20 जखमींना मात्र उपचारानंतर इस्पितळातून घरी पाठवण्यात आले असल्याचे समजते.