उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद जिल्हय़ातील बोधाश्रम येथील प्रचीन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. अर्थात अशा घटना नवीन नाहीत. तथापि, चोरीच्या प्रकरणाचा शोध घेताना एका खुनाचाही अनपेक्षितपणे शोध लागल्याने ही घटना चर्चेत आली. त्याचे झाले असे की. या मंदिरात तीन दिवसांपूर्वी रात्री चोर शिरले. त्यांनी देवाचे दागिने आणि तिजोरीतील रोख रक्कम बखोटीला मारली आणि तेथून पोबारा केला. सकाळी मंदीर व्यवस्थापनाने चोरीची तक्रार सादर केली.
चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासासाठी मंदिरात प्रवेश केला. त्यांना या मृतदेहाची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांनी नेहमीच्या तपास पद्धतीप्रमाणे चोरीचा तपास सुरू केला. पण तेथेच मागच्या बाजूला पडलेला मृतदेह पाहून प्रथम त्यांच्यातही घबराट निर्माण झाली. नंतर चोरीच्या तपासाबरोबरच या मृतदेहाचे रहस्य उलगडण्याचे कामही त्यांना हाती घ्यावे लागले.
हे प्रकरण हत्येचे आहे की आत्महत्येचे हे शोधले जात आहे. तसेच ही हत्या असेल तर ती चोरांनी केली की त्यापूर्वी झालेली आहे, याचाही तपास करावा लागणार असे पोलिस म्हणतात. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांवरून चोरी करणाऱयांचा शोध घेतला जात आहे. चोर सापडताच हत्येचे गूढही उकलणार, अशी पोलीसांची खात्री आहे.