ओटवणे/ प्रतिनिधी-
माडखोल गावासाठी कायमस्वरूपी वायरमनसाठी रविवारी १५ ऑगस्ट रोजी पोलवर चढुन लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते लखन आडेलकर आणि स्वप्निल लातये यांनी देताच सावंतवाडी वीज वितरण कंपनीचे उप अभियंता एस एस भुरे यांनी याची तात्काळ दखल घेत वायरमनची नेमणुक केली. त्यामुळे लखन आडेलकर आणि स्वप्निल लातये यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत वीज वितरण कंपनीचे उप अभियंता एस एस भुरे, माडखोल सरपंच संजय शिरसाठ, उपसरपंच शिवाजी परब, माजी सरपंच राजन राऊळ, माजी उपसरपंच अँड सुरेश आडेलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश नाईक, लखन आडेलकर, स्वप्निल लातये उपस्थित होते.
या बैठकीत संपूर्ण माडखोल गाव या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे उपस्थितांनी ठासून सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून उप अभियंता एस एस भुरे यांनी तात्काळ माडखोलसाठी मुख्य तंत्रज्ञ सुधाकर नवसाजी जाधव यांची नेमणुक केली. त्यामुळे कायमस्वरूपी वायरमनसाठी १५ ऑगस्ट रोजी पोलवर चढून पुकारलेले आंदोलन लखन आडेलकर आणि स्वप्निल लातये यांनी स्थगित केले.