गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला कायदा सुव्यवस्थेचा धावता आढावा
ऑनलाईन टीम / पुणे :
एल्गार परिषद प्रकरणाबद्दल पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकेटेशम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माहिती दिली. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही आयुक्तांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेचाही माहिती गृहमंत्री यांना दिली.
गृहमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनिल देशमुख पहिल्यांदा पुणे विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम तसेच पिंपरी चिंचवडे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्यासोबत धावती बैठक घेऊन माहिती घेतली. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, ही बैठक 10 ते 15 मिनीटांमध्ये पार पडली. यावेळी देशमुख यांनी एल्गार प्रकरणाची सद्य परिस्थिती तसेच त्यासंबंधी माहिती घेतली गेली. त्यासोबतच पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकूणच परिस्थिती, गुन्हेगारीविषयी माहिती घेतली.