प्रतिनिधी/ बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बेंगळूरला बदली झाली होती. बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर डॉ. विक्रम आमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी गृहखात्याने या संबंधीचा आदेश जारी केला आहे.
डॉ. विक्रम हे मुळचे सौदत्ती तालुक्मयातील मुनवळ्ळीचे सुपुत्र आहेत. प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केल्यानंतर पियुसीसाठी त्यांनी धारवाड गाठले. बिदर विद्यापीठात त्यांनी पशुसंगोपन विभागात पदवी मिळविली. त्यानंतर अथणी येथे एसबीआयमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
डॉ. विक्रम यांनी यापूर्वी बेळगावात सेवा बजावली आहे. पशुसंगोपन खात्याचे अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर ते पोलीस दलात रुजू झाले. बळ्ळारी व म्हैसूर येथे पोलीस उपअधिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. याबरोबरच म्हैसूरचे पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. चामराजनगर व मंगळूरचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजाविणाऱया डॉ. विक्रम यांना मुख्यमंत्र्यांचे पदकही मिळाले आहे.
गेली तीन वर्षे कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी उत्तमपणे सेवा बजावलेल्या सीमा लाटकर यांची बेंगळूरला बदली झाली आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर डॉ. विक्रम यांची नियुक्ती झाली असून लवकरच ते सुत्रे स्वीकारणार आहेत.