आचरा / प्रतिनिधी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या वाढलेल्या जबाबदारीचा परीणाम कुटुंबातील महिलांनाही सहन करावा लागला होता. सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने नेहमी तणावाचा सामना करणाऱ्या आचरा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी आणि पोलीस पत्नींनी सौ दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकत्र येत आचरा पोलीस स्टेशनला हळदीकुंकू चा कार्यक्रम आणि फनीगेम खेळत तणावमुक्त जीवनाचा आनंद घेतला .यावेळी हळदीकुंकू कार्यक्रमातून सुखदुःख जाणून घेत फनीगेम खेळत आचरा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचाऱी आणि पोलीस पत्नींनी तणावमुक्त जिवनाचा आनंद घेतला. यात आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या पत्नी सौ पाटील, आचरा सरपंच प्रणया टेमकर, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, स्वप्नाली मिठबांवकर, स्वाती आचरेकर, दामिनी पेडणेकर, यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी सौ धेंडे,सौ पडवळ,सौ कांबळे,सौ सावंत, तसेच दक्षता समिती सदस्या आदी सहभागी झाले होते.
यावेळी संगीत खुर्ची आदी खेळ घेत तणावमुक्त वातावरण अनुभवले