म्हापसा प्रतिनिधी : म्हापशातील कायदा तसेच सुव्यवस्था कायम आहे , स्थानिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे बार्देशातील गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण आहे. तथापि, कोवीड महामारीच्या काळात दिनरात्र सेवा बजावणार्या अनेक पोलिसांनी स्वतः कोरोना पॉझिटीव्ह असूनसुद्धा आत्मविश्वासाच्या बळावर कोवीडवर मात केल्याचे प्रतिपादन पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी म्हापशात केले.
म्हापसा शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलिस स्थानकाच्या इमारतीत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उत्तर गोवा पोलिस अधिक्षक उत्क्रीष्ट प्रसून, उप-अधिक्षक गजानन प्रभुदेसाई, म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर उपस्थित होते. दरम्यान, तत्पूर्वी म्हापशातील व्यापारी संघटणा तसेच सोन्या- चांदीच्या व्यापार्यांच्या शिष्टमंडळाच्या पोलिस महासंचालकांची व्यक्तीश : भेट घेत बाजारातील समस्यां?चा पाढा वाचला तसेच ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची त्यांना माहीती करून दिली. यावेळी पोलीस महासंचालकांनी बाजार परिसरात वाढत्या चोर्यांपासून काळजी घेण्यासाठी दुकानदारांनी आपापल्या दुकानात सीसीटीव्ही केमेरे बसवण्याबरोबरच शक्मय झाल्यास सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्याची ज्यूवेलर्स संघटणेच्या शिष्टमंडळाला सुचीत केले.
यावेळी म्हापशातील व्यापारी संघटणा तसेच ज्युवेलर्स संघटणा यांच्याशी पोलिस महासंचालकांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली व शहरातील सुव्यवस्था कायम राखण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या सोबतीने सर्वांनी एकत्रित येत काम करण्याचे त्यांना आवाहन केले. दरम्यान, अनेक पोलिस स्थानकात अपुऱया कर्मचारी वर्गामुळे होणारी गैरसोय लगेचच दूर होणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी पत्रकारांकडुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देतांना सांगितले.
पर्वरी जळीतका?ड प्रकरणातील मुख्य मास्टर माईंड असलेल्या राजकीय व्यक्तीकडे पोलिस कानाडोळा करतात की काय ? या प्रश्नांवर उत्तर देतांना याप्रकरणातील एकुण एक आरोपी कायद्याच्या कचाटय़ातून सुटणार नसल्याची ग्वाही पत्रकारांना दिली. दरम्यान, कोवीड महामारीच्या काळात अखंड सेवा देणार्या पोलिस कर्मचाऱयांचा गावांगावांतील सामाजिक संस्थाकडून कॉवीड वॉरियर्स म्हणून होत असलेला सन्मान पोलिस खात्याचे मनोबल उंचावण्यास निश्चितच मदत करणार असल्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी शेवटी सांगितल.