ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शनिवारी रात्री उशिरा दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाह यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. 2 ऑगस्टला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 14 ऑगस्टला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोनामुक्त झाल्यानंतरही त्यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार शनिवारी रात्री 11 च्या सुमारास शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.