सीबीडीटी प्रमुख महापात्र यांचे संकेत ः चालू आर्थिक वर्षासाठीचे ध्येय निश्चित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रत्यक्ष कर संकलन (सीबीडीटी) चालू आर्थिक वर्षाच्या अंतिम कालावधीपर्यंत 12.50 लाख कोटी रुपयाचे ध्येय प्राप्त करणार असल्याचा विश्वास सीबीडीटीचे अध्यक्ष जे.बी.महापात्र यांनी व्यक्त केला असून नवा विक्रम प्राप्त होणार असल्याचेही यावेळी म्हटले आहे.
करदात्यांसाठी अन्य प्रक्रिया सोपी करण्यासाठी कर अधिकाऱयांचे प्रयत्न होत आहेत. यासह अन्य कारणांमुळे कंपनी कर आणि वैयक्तिक करामधील कर संकलनात वाढ होण्याचे संकेत व्यक्त होत आहेत. एक फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 10.38 लाख कोटी रुपये राहिले आहे. यावेळी हा आकडा मागील वर्षातील एकूण संकलनाच्या तुलनेत मजबूत राहिला असून प्रत्यक्ष संकलन आतापर्यंत 11.18 लाख कोटी रुपयापेक्षा कमी झालेले नाही.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 12.50 लाख कोटी रुपयामध्ये 6.35 लाख कोटी रुपये कंपनी कररुपात तर 6.15 लाख कोटी रुपयांचा वैयक्तिक कर प्राप्त होणार असल्याचेही संकेत व्यक्त केले आहेत.
चालू वर्षात 12 लाख कोटींचा आकडा पार करणार
आम्ही चालू वर्षात 12 लाख कोटी रुपयांचा आकडा प्राप्त करणार असून आमचे ध्येय 12.50 लाख कोटी रुपये राहणार असल्याचे संशोधनातून सादर करण्यात आलेल्या माहितीमधून महापात्र यांनी स्पष्ट केले आहे.