वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या वर्षात होणाऱया प्रमुख आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांसाठी हॉकी इंडियाने वरिष्ठ महिलांच्या महत्त्वाच्या गटाची शुक्रवारी निवड केली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांतील कामगिरी पाहून 60 महिला खेळाडूंची बेंगळूरमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणात निवडचाचणी घेण्यात आली होती. त्यातून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ‘नव्याने सुरुवात करण्याची ही वेळ असून भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागणार आहे. गेल्या वर्षभरात टोकियोतील अनुभवाने आपला संघ समृद्ध झाला असून 2024 ऑलिम्पिकचा विचार ठेवून आणखी विकसित होण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवायला हवी,’ असे भारतीय महिला संघाचे प्रमुख प्रशिक्षक जॅनेक स्कॉपमन म्हणाले. या संघातील 18 सदस्यीय गट मस्कतमध्ये होणाऱया आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भाग घेणार असून उर्वरित खेळाडू शिबिरात राहून भुवनेश्वरमध्ये होणाऱया हॉकी प्रो लीगच्या सामन्यांची तयारी करणार आहेत. ही स्पर्धा पुढील महिन्यात होणार आहे.
निवडण्यात आलेले महत्त्वाचे खेळाडू ः सविता, रजनी एतिमर्पू, बिचू देवी खरिबम, दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, सुमन देवी थौडम, अक्षता आबासो ढेकळे, महिमा चौधरी, रश्मिता मिन्झ, निशा, सलिमा टेटे, सुशीला चानू पुखराम्बम, ज्योती, नवज्योत कौर, मोनिका, नमिता टोपो, मारियाना कुजुर, सोनिका, नेहा, बलजीत कौर, उपासना सिंग, लालरेमसियामी, नवनीत कौर, रजविंदर कौर, वंदना कटारिया, शर्मिला देवी, दीपिका, संगीता कुमारी, प्रीती दुबे, ऐश्वर्या राजेश चव्हाण. याशिवाय रिहॅबिलेशन शिबिरात असणाऱया राणी, रीना खोखर, मनप्रीत कौर.