बेतकी आरोग्य केंद्राचा विस्तारीकरण प्रकल्प पायाभरणी सोहळा : हेल्थ फॉर ऑल-विजन फॉर ऑल,टेली मेडीसीनद्वारे रूग्णांना दुरध्वनी माध्यमातून रूग्णसेवा.दोन थेंब रक्तातून 28 प्रकारणी रक्तचाचणी
वार्ताहर /माशेल
राज्य सरकार ‘प्रशासन तुमझ्या दारी’ पोचविण्यापासून येत्या काळात वैद्यकीय सेवा रूग्णांच्या दारापर्यत नेण्यासाठी कटीबद्ध आहे. ‘हेल्थ फॉर ऑल-विजन फॉर ऑल’ हा मंत्र वैद्यकीय स्वयंपुर्ण मित्रांना देण्यात आलेला आहे. येत्या 2 ऑक्टोबर पासून रूग्णांना दुरध्वनी माध्यमातून सेवा देण्याहेतूने ‘टेली मेडीसीन’ ही योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 25 खाटांचे नवीन इस्पितळाची उभारणीच्या कामाचा पायाभरणी सोहळय़ा ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. काल रविवारी दुपारी हा सोहळा पार पाडला. यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, सहकार मंत्री गोविंद गावडे, जीएसआयडीसीचे जोशुवा पिटर डिसौझा, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सिद्धेश नाईक, प्रिया च्यारी, सरपंच दिलीप नाईक, सनिल भोमकर, सत्यवान शिलकर, उन्नती नाईक, मंगेश गावडे, अनिशा गावडे, बिंदी परब, जनीता डिकॉस्ता, उपसरपंच अमिना वाडकर, संचालक जॉस डिसा, बेतकी आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. बॅडा पिंटो उपस्थित होते.
बेतकी आरोग्य केंद्र 18 महिन्यात पीएचसी टू सीएचसी
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की डिजीटल युगात वैद्यकीय सेवेत स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करताना ‘टेली मेडीसीन’ योजना वयोवृद्ध रूग्णांना उपयुक्त ठरणार आहे. रूग्णांना घरबसल्या तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरणासह कम्युनिटी आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे. जलदगतीने केंद्राची उभारणी येत्या 18 महिन्यात पुर्ण करण्याचा मनोदय असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. देशभरात वैद्यकीय सेवेत गोवा अगेसर असून दिनदयाळ स्वास्थ सेवा योजनेअंतर्गत खासगी इस्पितळातील सेवाही रूग्णांना विनामुल्य देत आहेत.
दोन थेंबा रक्तातून 28 प्रकारची चाचणी-मंत्री विश्वजीत राणे
आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की आरोग्य सेवा रूग्णांच्या दारापर्यत देण्यावर भाजपा सरकारचा भर राहिलेला असून याकामी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. वैद्यकीय सेवेत गोवा राज्यात नवे उपक्रम राबविण्यात येत आहे. रूग्णांच्या सेवेसाठी येत्या दिवसात प्रत्येक उप-आरोग्य केंद्रात केवळ रक्ताच्या दोन थेंबातून 28 प्रकारच्या रोगाचे निदान होण्याची सुविधा ग्रामिण रूग्णांना होणार आहे. रक्त चाचणीसाठी ‘आईस टेस्ट’ ही नवीन सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.
पीएचसी टू सीएचसी जाहीरनाम्याची वचनपुर्ती -गोविंद गावडे
प्रियोळ मतदार संघाचा आमदार झाल्यापासून ग्रामिण भागातील जनतेला उत्तम वैद्यकीय सेवा, पाणी व रस्ते देण्यासाठी आपले प्रयत्न राहिलेले आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची आज पुर्तता झाले. बेतकी आरोग्य केंद्राच्या विस्तारीकरण प्रकल्प हे आपले स्वप्न होते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे स्वप्नपुर्ती झाल्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. विस्तारीकरणाचा प्रकल्प रू. 30 कोटी खर्चुन उभारण्यात येत असून इस्पितळात कॅज्युलीटी विभाग, ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन ओटी, प्रसुतीगृह, 12 पुरूष व 13 महिलासाठी दोन वार्ड, त्याशिवाय 6 स्पेशल वार्डाची सोय असणार आहे. ओपीडी विभागात जनरल, होमियोपॅथी, गायनॅक, नेत्रतज्ञ, दातांचे डॉक्टर, त्याशिवाय लसीकरण विभागाची सोय येथे करण्यात आलेली आहे. अत्याधुनिक सुविधा पुरविताना एक्स रे, अल्ट्रा साऊड, ईसीजी, सोनोग्राफी, रक्त चाचणी प्रयोगशाळा या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय विर्स्तीण जागेत 50 वाहनांची पार्किगची सोय, कॅन्टीनही सोय करण्यात आलेली आहे.
पाच वर्षात प्रियोळ मतदारसंघाचा कायापालट
सद्यपरिस्थितीत प्रियोळ मतदारसंघात आमदार गोविंद गावडे यांच्या कार्यकाळात बाणस्तारी मार्केट प्रकल्प, मंगेशी टुरिस्ट शॉपिंग कॉम्पलेक्स, पाण्यासाठी जलकुंभ, म्हार्दोळ येथील पोलीस स्थानक, बेतकी पीएचसी टू सीएचसी हे लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लागत आहे. त्याशिवाय सरकारी प्राथमिक विद्यालयाचे नुतनीकरणाचे काम पुर्णत्वास आलेले आहे.
बेतकी आरोग्य केद्रांच्या अधिकारी डॉ. ब्रेडा पिंटो यांनी उपस्थितांचे स्वागत करताना बेतकी आरोग्य केंद्राच्या कार्याचा संपुर्ण आढावा घेतला व वाढत्या पेशंटमुळे आरोग्य केंद्राच्या विस्ताराची गरज होत ती आज पुर्ण होत असल्याने आनंद व्यक्त केला. यावेळी सरकारी अधिकारी जोस डिसा, सरपंच दिलीप नाईक यांनीही विचार मांडले.
बेतकी विस्तारीत प्रकल्पाचा शिलान्यास त्यानंतर नविन वास्तूच्या पायाभरणी नामफलकाचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलनाने सोहळय़ाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सर्वेद्र फडते यांनी केले. ढोल ताशा पथकाच्या गजराने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सरपंच दिलीप नाईक यांनी आभार मानले. सोहळयाला बेतकी-खांडोळा व प्रियोळ मतदार संघाचे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.