प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील प्रसिद्ध ट्रक मेकॅनिक आणि व्यावसायिक महम्मद बाबालाल सनदी (वय 79, रा. महालक्ष्मी नगर) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. रॉकेट ट्रक स्पेशालिस्ट म्हणून सनदी यांचा लौकिक होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू व शाईन इलेक्ट्रोप्लेटिंगचे मालक बाबजी सनदी आणि शाईन सर्विसिंग सेंटरचे मालक व ट्रक व्यवसायिक माजित सनदी यांचे ते वडील होत. जियारत शुक्रवार चार सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बागल चौक कब्रस्तान मध्ये आहे.