फोटो ः 2 पंचगंगा स्मशानभूमी ऑफिस नावाने फोटो केओपी डाटात सेव्ह केला आहे.
कोल्हापूर ः पंचगंगा स्मशानभूमीच्या कार्यालयात अधीक्षक आणि त्यांच्या चमूला चोवीस तास तीन शिफ्टमध्ये सेवा बजावावी लागते.
कोल्हापूर / संजीव खाडे
शहरासह जिल्हय़ात कोरोनाचा उदेक झाला आहे. दररोज कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येबरोबर कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडणाऱयांची वाढती संख्या गंभीर परिस्थिती दर्शवत आहे. या पार्श्वभूमीवर पंचगंगा स्मशानभूमीत 1 ते 31 ऑगस्ट या 31 दिवसांत तब्बल 712 कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार झाले आहेत. नैसर्गिकरित्या निधन झालेले 258 आणि कोरोनाने मृत्यु झालेले 712 अशा तब्बल 970 जणांवर ऑगस्ट महिन्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यात महत्वाची बाब म्हणजे पंचगंगा स्मशानभूमीतील अधिकारी आणि कर्मचारी गेली चार महिने अवितरणपणे अंत्यसंस्काराचे कार्य करण्यासाठी परिश्रम घेत आहे.
कोल्हापूर जिल्हा आणि शहरात कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या कमी होती. पण मे महिन्यापासून त्यात वाढ होत गेली. सर्वात कहर झाला होता ऑगस्ट महिन्यात. ऑगस्टमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या सर्वाधिक ठरली. चिंता वाढविणारी आकडेवारी पंचगंगा स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराच्या नोंद वहीतून मिळते. 1 ते 31 ऑगस्ट या 31 दिवसांच्या काळात पंचगंगा स्मशानभूमीत 970 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे मरण पावलेल्यांची संख्या 712 होती. या 712 जणांमध्ये शहरातील 376 आणि शहराबाहेरील जिल्हय़ातील इतर ठिकाणच्या 336 जणांचा समावेश होता. त्याचबरोबर नैसर्गिक व इतर कारणांनी मरण पावलेल्याची संख्या 258 इतकी होती.
दररोज कोरोनाने मरण पावणाऱयांची संख्या 23
पंचगंगा स्मशानभूमीत ऑगस्टच्या आकडेवारीनुसार दररोज दहन केले जाणाऱया मृतांची संख्या 31 होते, त्यात कोरानामुळे मरण पावलेले 23 जण असतात. ही आकडेवारी पंचगंगा स्मशानभूमीतील नोंद वहीतून पुढे येणारी आहे. त्याचबरोबर शहरातील कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प या ठिकाणी स्मशानभूमी आहेत. तेथे नैसर्गिकरित्या मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देण्यात येते. नैसर्गिक कारण, वृद्धापकाळ, इतर आजारापेक्षा कोरोनामुळे मरण पावलेल्याची वाढती संख्या अधोरेखित होते. त्यामध्ये जिल्हय़ात इतरत्र कोरोनाच्या बळींची संख्या वेगळी आहे.
पंचगंगा स्मशानभूमीत तीन शिफ्टमध्ये अवितरणपणे सेवा
पंचगंगा स्मशानभूमी तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे. आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे आणि त्यांचे पंधराहून अधिक कर्मचारी गेली चार महिने अविरतपणे सेवा बजावत आहेत.
दुपटीने मृतदेहांचे दहन
कोरोनापूर्वी पंचगंगा स्मशानभूमीत दररोज सरासरी 15 ते 18 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असत. आता कोरोनाच्या काळात हा आकडा दुपटीहून अधिक प्रमाणात वाढला आहे. अशास्थितीत येथील कर्मचारी पीपीई कीट परिधान करून कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करतात.