नवी दिल्ली : देशामध्ये चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष प्राप्तिकर संकलनात 48 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. सदरची कामगिरी इतिहासातील उच्चांकी कामगिरी राहिली असल्याचा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) चे अध्यक्ष जे.बी.महापात्र यांनी यावेळी केला आहे.
यामध्ये अधिकच्या कर संकलनाच्या आकडेवारीच्या मदतीने चालू आर्थिक वर्षातील पेमेंटमध्ये 41 टक्क्यांची वृद्धी राहिली आहे. यावेळी महापात्रांनी सांगितले की, आजच्या तारखेपर्यंत निव्वळ स्वरुपात प्रत्यक्ष प्राप्तिकर संकलन 13.63 लाख कोटी रुपये राहिले आहे. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीच्या तुलनेत वाढ 48 टक्क्यांनी अधिक राहिली आहे.
वर्षाच्या आधारे निव्वळ कर संकलन 2020-21 च्या समान कालावधीपासून 48.4 टक्के अधिक आहे. 2018-19 मध्ये 35 टक्के अधिक राहिल्याची नोंद आहे. मागील काही वर्षातील 2.5 लाख कोटी रुपये हा आकडा उच्चांकी पातळीवरील आहे.