प्रतिनिधी/ फलटण
फलटण नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्य व सभापतींच्या निवडी निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद येथे बिनविरोध पार पडल्या.
नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिध्द सभापती आणि उपनगराध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती असल्याने या दोन्ही सभापतीपदी अनुक्रमे नीता मिलींद नेवसे आणि नंदकुमार आबाजी भोईटे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी विक्रम जाधव, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, स्वच्छता विषयक वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापतीपदी दिपाली निंबाळकर, शिक्षण समितीच्या सभापतीपदी सनी अहिवळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी वैशाली चोरमले आणि उपसभापतीपदी मनिषा घोलप यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
स्थायी समितीचे सभापतीपदी नगराध्यक्षा नीताताई नेवसे (पदसिध्द), तर उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे व अन्य समित्यांचे सभापती हे या समितीचे सदस्य असून उर्वरित 3 जागेवर सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे व अशोक जाधव यांची निवड बिनविरोध करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी विक्रम जाधव यांची निवड झाली असून या समितीमध्ये मधुबाला भोसले, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, सनी अहिवळे, वैशाली अहिवळे, सचिन अहिवळे, रश्मी नाईक-निंबाळकर यांचा समावेश आहे.
पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी रघुनाथराजे नाईक- निंबाळकर यांची निवड झाली असून या समितीमध्ये मधुबाला भोसले, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, मनिषा घोलप, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, मंगलादेवी नाईक-निंबाळकर यांचा समावेश आहे. तर आरोग्य रक्षण समितीच्या सभापतीपदी दिपाली निंबाळकर यांची निवड झाली असून या समितीमध्ये सुवर्णा खानविलकर, अजय माळवे, आसिफ मेटकरी, पांडुरंग गुंजवटे, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचा समावेश आहे.
शिक्षण समितीच्या सभापतीपदी सनी अहिवळे यांची निवड झाली असून या समितीमध्ये सुवर्णा खानविलकर, अजय माळवे, प्रगती कापसे, अनुप शहा, रश्मी नाईक-निंबाळकर, मीना नेवसे यांचा समावेश आहे. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी वैशाली चोरमले व उपसभापतीपदी मनिषा घोलप यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी विषय समित्यांचे सदस्य, सभापती, स्थायी समितीवरील तीन सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली.