फलटण / प्रतिनिधी :
फलटण शहरातील खंडोबा मंदिराशेजारी एका दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मोबाईलवर तसेच रोख स्वरूपात पैसे स्विकारून आयपीएल क्रिकेट मॅचेसवर तसेच कल्याण नामक मटक्यावर पैसे घेऊन जुगार चालत असलेल्या अड्डय़ावर फलटण शहर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन पोलिसांनी 1 लाख 98 हजार 837 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास जयकुमार पवार यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर जयकुमार शंकर पवार, वैभव सुनील जानकर, शशांक प्रशांत लांडे, शौकत शेख, अमर पिसाळ, दत्ता कुंभार, सुमित चोरमले, अमित कूरकुटे, अमोल काळे, संतोष काळे, जेबले यांच्याकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात पैसे स्वीकारून आयपीएल क्रिकेट मॅचेस वर तसेच कल्याण नामक मटका सुरू होता.
पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून एलईडी टीव्ही, ऍक्टीव्हा मोटारसायकल, 4 मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा 1 लाख 98 हजार 837 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर कलम 195/2021 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.