पुढच्या काही महिन्यांमध्ये फाईव्ह जी तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची शक्यता असल्यारमुळे नवा फोन खरेदी करताना फाईव्ह जीवाल्या फोनला प्राधान्य दिलं जात आहे. विविध कंपन्यांनी फाईव्ह जी फोन बाजारात उतरवले आहेत. तुम्हीही नवा स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील.
- फाईव्ह जी फोन फोर जी फोनपेक्षा थोडा महाग असतो. त्यामुळे फाईव्ह जी फोन घेत असाल तर इंटरनेटच्या वेगाकडे लक्ष द्या. तसंच फाईव्ह जी आल्यानंतर फोर जी सेवा बंद होणार नाही. त्यामुळे फोनची खरेदी पूर्ण विचारांती करा. गरज असेल तरच फाईव्ह जी फोन खरेदी करा.
- सध्या भारतात फाईव्ह जी सेवा प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे ही सेवा नेमकी कधी सुरू होईल हे आत्ताच सांगता येत नाही. याच कारणामुळे बर्याच कंपन्या सिंगल बँडवाले फाईव्ह जी स्मार्टफोन बाजारात उतवरत आहेत. अशा स्मार्टफोनमध्ये फाईव्ह जी आल्यानंतरही फोरजी इतकाच स्पीड मिळतो. त्यामुळे असे फोन खरेदी करण्यात काहीच अर्थ नाही.
- एमएम वेव्ह रेडिओ फ्रिक्वेंसीवाले फोन खरेदी करू नका. भारतात अजून फाईव्ह जी आलेलं नाही. त्यामुळे सब 6 जीएचझेड फाईव्ह जी फ्रिक्वेंसी सपोर्टवाले फोन खरेदी करा. हे मिड रेंज बँडचे फोन असतात. त्यामुळें तांत्रिक माहिती घेऊन मगच फाईव्ह फोन घ्या.
- फाईव्ह जी स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नवा फाईव्ह जी फोन घेताना त्याच्या बॅटरी लाईफची नीट माहिती घ्या. फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होत नाही ना, याची खात्री करून घ्या. तपासून घ्या.
- फाईव्ह जी स्मार्टफोनचा प्रोसेसरही दर्जेदार असायला हवा. त्यामुळे फाईव्ह जी प्रोसेसर सपोर्ट असणारे स्मार्टफोन विकत घ्या.