ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत फाटक्या जिन्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या फाटक्या जीन्सवरील वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका करण्यात येत आहे. आता या प्रकरणात अभिनेत्री कंगना रानौतने उडी घेतली आहे.
कंगनाने यावेळी वेगळ्या अंदाजात पण स्वतः ची तारीफ करतच आपले मत मांडले. तिने आपल्या ट्विटमध्ये स्वतः चे काही फोटो शेअर केले आणि म्हणाली की, जर तुम्हाला रिप्ड जीन्स घालायची असेल तर सुनिश्चित करा की त्यामध्ये कुलनेस तेवढीच असावी जेवढी या फोटोंमध्ये दाखवली आहे. ज्यामध्ये तुमच्या स्टाईलची झलक दिसेल नाही तर बेघर भिकारी दिसाल. आज कालचे तरुण असेच दिसतात. तिच्या या तत्वज्ञानाला अनेक युजर्स नी तिला ट्रोल केले आहे.
दरम्यान, तीरथ सिंह रिप्ड जीन्स घावणाऱ्या महिलांवर टीका केली होती. फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानाची उर्मिला मातोंडकर, जया बच्चन, गुल पनाग आदींनी निंदा केली आहे.