ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अत्यावश्यक औषधांसह वैद्यकीय उपकरणांची देशात कमतरता भासत आहे. अनेक देशांनी भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेच्या ‘फायझर’ या फार्मा कंपनीनेही भारताला 7 कोटी अमेरिकन डॉलर्स किंमतीची औषधे पाठवण्याची घोषणा केली आहे.
फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बॉरला म्हणाले, भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. फायझर कंपनीमार्फत आम्ही भारताला 7 कोटी डॉलर्सची औषधे पाठवणार आहोत. तसेच भारतात आमच्या लसीला लवकरात लवकर परवानगी देण्यासाठी सरकारशी चर्चा सुरू आहे. महिनाभरापूर्वीच भारतात लसीच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे. मात्र, अद्याप त्याची नोंद झाली नाही.