नवी दिल्ली
ऑनलाइन औषध क्षेत्रातील कंपनी फार्मइझी आपला आयपीओ आणणार असून त्यासाठीच्या तयारीला कंपनीने वेग दिला आहे. सदरच्या आयपीओकरीता कंपनीने ऑक्टोबरमध्ये बाजारातील नियामक सेबीकडे रीतसर अर्ज करणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरचा आयपीओ कंपनी चालू आर्थिक वर्षात सादर करणार असून याअंतर्गत 200 ते 300 दशलक्ष डॉलर्सची रक्कम उभारली जाणार असल्याचे समजते.