जा न्हवी कपूर खूपच ग्लॅमरस आहे. धडक या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी फिटनेस जपायला हवा. जान्हवीला हे चांगलंच माहीत आहे. म्हणूनच जान्हवी स्वतःला जपते. फिटनेस राखण्यासाठी जान्हवी काय करते याविषयी…
- जान्हवीचा साईज झीरो या संकल्पनेवर विश्वास नाही.
- सकाळच्या न्याहरीवर जान्हवीचा भर असतो. फळांचा रस, अंडी आणि ब्रेड असे पदार्थ ती न्याहरीमध्ये घेते. सिरिअल्स आणि दूध यांचा समावेशही तिच्या न्याहरीत असतो.
- दुपारच्या जेवणात ती घरच्या अन्नाला प्राधान्य देते. त्यात बरेचदा डाळ-भाताचा समावेश असतो.
- तिचा रात्रीचा आहार हलका असतो. रात्रीच्या जेवणात ती मासे खाते. कधी फक्त सूप पिते. रात्री झोपण्याच्या तीन तास आधी जेवण्यावर तिचा भर असतो.
- जान्हवी जीममधल्या व्यायामावर फार भर देत नाही. एका आठवडय़ात ती दोनदा जीमला जाते. जीममध्ये ती कार्डिओ करते तसंच हलकं वजन उचलण्याचे व्यायामही करते. इतर दिवशी ती पोहणं, दोरीच्या उडय़ा, चालणं यापैकी एखादा व्यायाम करते. यासोबतच आठवडय़ातले तीन दिवस ती योगा करते.