27 महिलांचा सहभाग : परदेशातील महिलाही ऑनलाईन पद्धतीने सहभागी
प्रतिनिधी / बेळगाव
फिटनेस प्रशिक्षिका संध्या पाटील यांच्या पुढाकाराने दुसऱया रेल्वेगेटजवळ रथ सप्तमीच्या दिवशी सलग 108 सूर्यनमस्कार घालण्यात आले. प्रत्यक्षात 27 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे सात वर्षाच्या मुलींपासून 68 वर्षाच्या आजींनी सूर्यनमस्कार घातले. ऑनलाईन पद्धतीने अमेरिका, बहारीन व बेंगळूर येथील महिलासुद्धा यात सहभागी झाल्या होत्या. संध्या पाटील यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व स्पष्ट केले. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्याच्या सदृढतेसाठी सूर्यनमस्कार हे अत्यंत उपयोगी असल्याचे सांगितले.