क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 35 वर्षावरील क्रिकेपटपटूंसाठी फिनिक्स मास्टर्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण जिमखाना मैदानावर मोठय़ा दिमाखात पार पडले.
या चषकाच्या अनावरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू संगम पाटील, संघमालक चंदन पुंदरनाड, सचिन कलवाड, प्रणय शेट्टी, सलीम फनीबंद, जोतिबा गिलबिले, सचिन साळुंखे आदी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत स्पर्धा सचिव परशराम पाटील यांनी पुष्पगुच्छ देवून केले. संगम पाटील यांच्या हस्ते स्पर्धेतील चषकांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी संगम पाटील म्हणाले 35 वर्षांवरील क्रिकेटपटूंना तुम्ही संधी मिळवून दिली आहे. 35 वर्षांत क्रिकेटपटू निवृत्त होतो पण बेळगावांत या ज्येष्ठ क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट स्पर्धा भरवून त्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत हे कौतुकास्पद आहे. यावेळी मिलींद चव्हाण, महांतेश देसाई आदी क्रिकेटपटू उपस्थित होते.