नागपूर : सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेतील सामन्यात विदर्भ संघातील गोलंदाज अक्षय कर्नेवारने मणिपूरविरूद्ध नवा विश्वविक्रम नोंदविला. क्रिकेटच्या टी-20 प्रकारातील अक्षयचा नवा विश्वविक्रम असून त्याने आपली चारही षटके निर्धाव टाकत दोन बळी मिळविले. तसेच त्यानंतर त्याने दुसऱया दिवशी हॅट्ट्रिक नोंदविली.
विदर्भ आणि मणिपूर यांच्यातील झालेल्या सामन्यात विदर्भने मणिपूरचा 167 धावानी दणदणीत पराभव केला. विदर्भ संघातील गोलंदाज 25 वर्षीय अक्षय कर्नेवारने आपली निर्धारित चारही षटके निर्धाव टाकत दोन गडी बाद केले. विदर्भने 20 षटकात 222 धावा जमवले. प्रत्युत्तरात मणिपूरचा डाव 16.3 षटकात 55 धावांत आटोपला. अन्य एका लढतीत विदर्भने 20 षटकांत 205 धावा रचल्या. प्रत्य़ुत्तरात सिक्कीमने 20 षटकात 8 बाद 75 धावांवर समाधान मानावे लागले.
विदर्भ संघाने प्लेट गटातून पाच सामन्यांतून 20 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले असून या गटात मेघालय दुसऱया तर त्रिपुरा तिसऱया स्थानावर आहे. अक्षय कर्नेवारने या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामन्यात 10 गडी बाद केले आहेत.