ऑनलाईन टीम / मिंडानाओ :
फिलिपिन्सच्या मिंडानाओमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल एवढी होती. तेथील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 37 मिनिटांनी हा भूकंप झाला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटावर कोलंबियो शहरापासून जवळपास 7.7 किलोमीटर अंतरावर जमीनीखाली 14 किलोमीटर आत होता. या भूकंपात शहरातील काही घरांचे नुकसान झाले आहे.