शहापूरच्या प्रकाशचा महाराष्ट्र-गोव्यातही प्रताप, दोघा जणांना अटक, 51 लाखांचा ऐवज जप्त, गावठी पिस्तूल, अवजारे ताब्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
आठ दिवसांपूर्वी झाडशहापूर येथे थरारक पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा आंतरराज्य गुन्हेगारांकडून मोठय़ा प्रमाणात दागिने जप्त करण्यात आले आहेत. 51 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज बेळगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केला असून 848 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, एक कार जप्त करण्यात आली आहे. फुटकळ चोऱया करता करता कोटय़धीश बनलेल्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळण्यात आल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी तब्बल आठ दिवस महाराष्ट्र व गोव्यात तपास करून 42 लाख 40 हजार रुपये किमतीचे 848 ग्रॅम दागिने जप्त केले आहेत.
प्रकाश विनायक पाटील (वय 30, मूळचा रा. सरस्वतीनगर, शहापूर, सध्या रा. जेरीवाडा-साखळी-गोवा), निथाई खालीपद मंडल (वय 41, रा. कालीतला, पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. या टोळीने बेळगाव शहरात 7 घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे. एपीएमसी, कॅम्प, मारिहाळ, माळमारुती पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात गुन्हे केल्याची कबुली या जोडगोळीने दिली आहे.
6 डिसेंबर रोजी दुपारी झाडशहापूर येथील माजी चेअरमन मल्लाप्पा गोरल व त्यांच्या भावाच्या घरी चोरीचा प्रकार घडला होता. भरदिवसा घरफोडी करून बाहेर पडताना या जोडगोळीला एका महिलेने पाहिले होते. संशयावरून महिलेने आरडाओरड करताच स्वतःचा बचाव करण्यासाठी या जोडगोळीने तेथून पळ काढला होता.
नेमके याचवेळी कामानिमित्त या मार्गावरून जाणारे बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील चन्नाप्पा हुंचाळ व योगेश तळेवाड हे दोन पोलीस जात होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना या संबंधीची माहिती देताच या दोघा जणांनी थरारक पाठलाग करीत शेतवडीत झडप घालून त्यांना अटक केली होती. प्रकाश पाटील याने तर त्यांना चाकूने भोसकण्याची धमकी दिली होती.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, चंद्रशेखर निलगार, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक आनंद आदगोंड, हवालदार बी. ए. चौगला, योगेश तळेवाड, चन्नाप्पा हुंचाळ, एम. एस. गाडवी, एन. एम. चिप्पलकट्टी, जी. वाय. पुजार, एस. एम. लोकुरे आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी जीए 06 ई 2869 क्रमांकाची हय़ुंडाई पेटा कार, घरफोडी करण्यासाठी लागणारी अवजारे, एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, 848 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईने सात घरफोडय़ांचा छडा लागला असून तपास पथकातील अधिकारी व पोलिसांना पोलीस आयुक्तांनी बक्षीस दिले आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार 6 डिसेंबर रोजी थरारक पाठलाग करून प्रकाश व त्याचा साथीदार निथाई या दोघा जणांना ताब्यात घेऊन त्याच दिवशी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 8 डिसेंबर रोजी 7 दिवसांसाठी त्यांना पोलीस कोठडीत घेण्यात आले. महाराष्ट्र व गोव्यात पोलीस पथके पाठवून घरफोडी प्रकरणांचा तपास करण्यात आला. या जोडगोळीने बेळगावात चोरलेले दागिने गोव्यात साठवून ठेवले होते. बेळगाव पोलिसांनी गोव्यात हे दागिने जप्त केले आहेत.
कारमधून प्रवास… भरदिवसा गुन्हे
प्रकाश पाटील हा चोऱया-घरफोडय़ांसाठी गोव्यातून कारमधूनच बाहेर पडतो. घराबाहेर पडताना बॅगेत कडीकोयंडा तोडण्यासाठी लागणारी अवजारे, चाकू, जांबिया, गावठी पिस्तूल आदी घातक शस्त्रs असतातच. झाडशहापूरमध्ये येऊन स्थानिकांना चाकूचा धाक दाखवत तो पलायनाचा प्रयत्न करीत होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मोठय़ा धाडसाने त्याच्यावर झडप घालून त्याला व साथीदाराला अटक केली होती.
तीन राज्यात घरफोडय़ा
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यात घरफोडय़ा करणारा प्रकाश पाटील हा आंतरराज्य अट्टल गुन्हेगार आहे. यापूर्वीही त्याला बेळगाव, चंदगड, सावंतवाडी, हुबळी-धारवाडसह तीन राज्यांतील वेगवेगळय़ा पोलिसांनी अटक केली होती. एखाद्या गुह्यात जामिनावर बाहेर पडला की तो पुन्हा घरफोडय़ा करण्यासाठी बाहेर पडतो. प्रकाश हा कुख्यात आंतरराज्य गुन्हेगार असून त्याचे साथीदार मात्र नेहमी बदलत असतात.
तपास अधिकाऱयांची तत्परता
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील दोन पोलिसांनी धाडसाने ताब्यात घेतलेल्या जोडगोळीची चौकशी करून त्यांच्याजवळून तब्बल 848 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्याचे काम पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांनी केले आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन या जोडगोळीला दोन वेळा पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी केवळ आठ दिवसांत 7 घरफोडय़ांचा तपास लावला आहे.