वृत्तसंस्था/ थेनीपलम (केरळ)
येथील मोहम्मद कोया स्टेडियमवर शनिवारी 25 व्या अखिल भारतीय फेडरेशनच्या राष्ट्रीय फेडरेशन चषक वरिष्ठांच्या ऍथलेटिक्स स्पर्धेला मोठय़ा थाटात प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये 158 महिला खेळाडूंसह किमान 500 ऍथलीट्स सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
चालूवर्षी होणाऱया राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडास्पर्धेच्या दृष्टीकोनातून सरावाकरिता या स्पर्धेला विशेष महत्त्व दिले जात आहे. भारतीय ऍथलीट्ससाठी दोन सरावाच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रीय खुली थ्ा्राs बॉल स्पर्धा पतियाळात, राष्ट्रीय खुली त्याचप्रमाणे दोन इंडियन ग्रा प्रि ऍथलेटिक्स स्पर्धा थिरूवनंतपूरम येथे होणार आहेत. देशातील विविध ऍथलिट्सना तसेच प्रशिक्षकांना आपल्या पूर्वतयारीचा अंदाज घेण्यासाठी फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धा महत्त्वाची आहे.
2022 ऍथलेटिक्स हंगामात विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसह एकूण तीन आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धा भरविल्या जाणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने पात्र फेरी दर्जा निश्चित केला आहे. बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 28 जुलैपासून तर चीनमधील हेंगझोयु येथे आशिया क्रीडास्पर्धा 10 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे.
फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पुरूष आणि महिलांच्या 10 हजार मी. धावणे, महिलांची पोल व्हॉल्ट या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदकासाठी लढती होतील. कार्तिककुमार, अभिषेक पाल, धर्मेंद्र, मुरलीकुमार गावित, नरेंद्र प्रतापसिंग हे धावपटू पुरूषांच्या विभागात तर संजीवनी जाधव, कविता यादव या धावपटू महिलांच्या विभागात सुवर्णपदकासाठी प्रयत्न करतील.
महिलांच्या पोल व्हॉल्ट या क्रीडा प्रकारात व्ही. पवित्राच्या गैरहजेरीत पुजा, रोझी मीना आणि बार्निंका यांच्यात चुरस राहील. पुरूष आणि महिलांच्या 100 मी., 400 मी. त्याचप्रमाणे पुरूषांच्या लांबउडी हे क्रीडाप्रकार होणार आहेत.